एसएनडीटी महाविद्यालयामध्ये सुरू होणार सुगम संगीत अभ्यासक्रम

24 Jul 2024 16:47:09

Music
चर्चगेट येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयातर्फे १ ऑगस्ट २०२४ पासून सुगम संगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. भारतीय पारंपरिक संगीताचा वारसा आणि त्याची शिकवण देणाऱ्या या अभ्यासक्रमाचा कालावधी १ वर्षाचा आहे.
 
आठवड्यातील दोन दिवस हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. दहावी उत्तीर्ण कोणत्याही वयोगटातील महिला या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी नोंदणी शुल्क १०० रुपये आणि प्रवेश शुल्क ४००० रुपये आहे. अभ्यासक्रमाविषयी अधिक माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Powered By Sangraha 9.0