हिंदू धर्मातील सनातन पद्धतीने दैनंदिन पूजा-विधी शास्त्राप्रमाणे करणे हे प्रत्येकाचे धर्मकार्य आहे. मात्र याबाबत असलेल्या अज्ञानामुळे अनेक पूजापद्धती शास्त्रोक्त पद्धतीने होत नाहीत. त्यामुळे हिंदू धर्म पद्धतीने दैनंदिन पूजा विधी व्हावी याकरीता समस्त हिंदू धर्म बांधवांसाठी हे शिबिर घेण्यात येत आहे. ह.भ.प.भागवताचार्य धनंजयजी देशपांडे महाराज आणि ह.भ.प.वे.शा.सं. महेशजी जोशी गुरुजी हे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील. समस्त हिंदू बांधव, युवा युवती यांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.