शास्त्रोक्त विधीवत पुजापद्धती मार्गदर्शन शिबिर

23 Jul 2024 17:11:17

Vishwa Hindu Parishad

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Pujapaddhati Shibir)
विश्व हिंदू परिषद अंतर्गत मंदिर अर्चक पुरोहित आयाम, धुळे जिल्हाच्या वतीने 'शास्त्रोक्त विधीवत पुजापद्धती मार्गदर्शन शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. शनिवाद, दि. २७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता श्री पद्मनाभ स्वामी महाराज (नारायणबुवा) समाधी मंदिर, धुळे येथे शिबिर संपन्न होईल.

हे वाचलंत का? : मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान कट्टरपंथीयांचा हिंसाचार; योगींच्या बुलडोझरने आरोपींची घर जमीनदोस्त

हिंदू धर्मातील सनातन पद्धतीने दैनंदिन पूजा-विधी शास्त्राप्रमाणे करणे हे प्रत्येकाचे धर्मकार्य आहे. मात्र याबाबत असलेल्या अज्ञानामुळे अनेक पूजापद्धती शास्त्रोक्त पद्धतीने होत नाहीत. त्यामुळे हिंदू धर्म पद्धतीने दैनंदिन पूजा विधी व्हावी याकरीता समस्त हिंदू धर्म बांधवांसाठी हे शिबिर घेण्यात येत आहे. ह.भ.प.भागवताचार्य धनंजयजी देशपांडे महाराज आणि ह.भ.प.वे.शा.सं. महेशजी जोशी गुरुजी हे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील. समस्त हिंदू बांधव, युवा युवती यांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0