SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांना दोन मानद पदवी प्रदान!

23 Jul 2024 17:33:32
 
Ujjwala Chakradeo
 
मुंबई : SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांना दोन प्रतिष्ठित मानपदवी प्रदान करण्यात येणार आहेत. येत्या २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अतिरिक्त महासंचालनालयाचे मेजर जनरल योगेंदर सिंह यांच्या हस्ते त्यांना कर्नल पदवी प्रदान करण्यात येणार आहे. एसएनडीटी विद्यापीठाच्या पाटकर हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी अनेक एनसीसीचे आणि विद्यापीठाचे मान्यवर उपस्थित राहतील.
 
यासोबतच प्रा. उज्वला चक्रदेव यांना भारतीय संस्कृती वारशाचे रक्षण करण्यासाठी योगदान दिल्याबदल भारतीय संस्कृती संरक्षण सम्मान पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. भारतीय डॉक्यूमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशनद्वारे हा पुरस्कार दान करण्यात येणार आहे.
 
हे वाचलंत का? -  अर्थसंकल्पातून 'विकसित भारताचे' दमदार उड्डाण!
 
एसएनडीटी महिला विद्यापीठ आपल्या विद्यार्थिनींना शिक्षणासोबतच, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय भावना यांचेही शिक्षण देते. प्रा. चक्रदेव यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने अनेक यशस्वी उपक्रम राबवले आहेत. या दोन्ही मानपदवी हे त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचे प्रतीक आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0