राज्यानंतर केंद्राचीही 'लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजना'!

टॉप पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशीपची संधी

    23-Jul-2024
Total Views |
 
Budget
 
नवी दिल्ली : राज्यानंतर आता केंद्रानेही केंद्राचीही 'लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजना' सुरु केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात देशातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. देशातील ४.१ कोटी तरुणांना रोजगार देण्यासाठी १.४८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील तरुणांना याचा मोठा फायदा होणार असून सरकार तरुणांना इंटर्नशिपपासून ते ईपीएफओ आणि उच्च शिक्षणापासून प्रशिक्षणापर्यंत मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.
 
पंतप्रधान पॅकेज अंतर्गत 'रोजगार संबंधित प्रोत्साहन' या योजनेत तीन प्रमुख योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यात रोजगार, कौशल्य, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करत सरकारने पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
 
हे वाचलंत का? - SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांना दोन मानद पदवी प्रदान!  
 
याअंतर्गत २० लाख तरुणांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एक हजार कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे अपग्रेडेशन करण्यात येणार असून नव्याने कौशल्य विकास कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे.
 
यासोबतच पुढील पाच वर्षात एक करोड तरुणांना देशातील टॉपच्या कंपन्यांमध्ये कौशल्य शिक्षण दिले जाणार आहे. यात दरमहा ५,००० रुपये इंटर्नशिप भत्ता आणि ६,००० रुपयांची एकरकमी मदत दिली जाईल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
 
त्या म्हणाल्या की, "रोजगार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही उद्योगांच्या सहकार्याने महिला वसतिगृहे आणि बालगृहे स्थापन करणार आहोत. ही योजना महिला कौशल्य कार्यक्रमाला प्रोत्साहन देईल. १ लाख रुपये पगार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे," असे त्यांनी सांगितले.