नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीत काय घडतं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आमदार अपात्र होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने त्यांच्यात प्रत्येकी दोन गट निर्माण झाले आहेत. यापैकी शिंदेंच्या नेतृत्वातील एक गट आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील एक गट सध्या महायूती सरकारमध्ये आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिंदे गटाला बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला होता. पंरतू, त्यांनी ठाकरे आणि शिंदे या दोनपैकी कोणाचेही आमदार अपात्र ठरवले नव्हते.
त्यामुळे उबाठा आणि शरद पवार गटाने राहूल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार असून यात काय निर्णय होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.