अर्थसंकल्प २०२४-२५! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस; मस्य शेतीवरसुद्धा विशेष लक्ष

23 Jul 2024 12:26:02
 
Nirmala Sitharaman
 
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असं अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 
शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती वापरल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. त्यासोबतचं जास्त उत्पादकता असलेल्या पिकांच्या जातीच्या संशोधनाला चालना देण्यात येणार, असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच सरकार सरकार सेंद्रिय शेतीवर भर देणार आहे.
 
हे वाचलंत का? -  अर्थसंकल्प २०२४-२५! सरकारने जाहीर केली प्राधान्यक्रमाची यादी; 'या' क्षेत्राकडे असणार विशेष लक्ष
 
पिकांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीसाठी व्यवस्था करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच भाजीपाला उत्पादन आणि पुरवठा साखळीसाठी क्लस्टर तयार केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यासोबतचं मस्य उत्पादनाला चालना देण्यासाठी कोळंबी उत्पादन आणि संशोधनावर काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 
देशाची डाळी आणि तेलबियांच्या निर्यातीवरची निर्भरता संपुष्टात आणण्यासाठी मिशन मोडवर काम केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्यासोबतच देशातील ४०० जिल्ह्यांमध्ये पिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासोबतच ३२ पिकांच्या १०९ नवीन जाती आणल्या जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0