विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटाला मिळाली गुड न्यूज!

23 Jul 2024 17:19:21

bad newz 
 
 
मुंबई : विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येईल की नाही असा संभ्रम होता. पण, या चित्रपटाने अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटाला मागे टाकत भरघोस कमाई केली आहे.
 
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘बॅड बॉईज’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटी, दुसऱ्या दिवशी १०.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी ११.१५ कोटी, चौथ्या दिवशी ३.५ कोटी कमवत या चित्रपटाने आत्तापर्यंत ३३.२ कोटी कमावले आहेत.
 
 
 
मात्र, अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटाने बॉक्स ऑफिसरवर निराशाजनक काम केलं आहे. 'सरफिरा'ने ११ दिवसांत केवळ २१.४५ कोटीच कमावले आहेत. मुळात गेली अनेक वर्ष अक्षय कुमारचे चित्रपट प्रेक्षकांना आवडत नसल्याचेही दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0