नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये नवीन कर प्रणालीची निवड करणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना कर सवलत देण्यासाठी अनेक आकर्षक लाभांची घोषणा केली आहे.
अर्थमंत्र्यांनी पगारदार कर्मचाऱ्यांसाठी मानक कपात 50,000 रुपयांवरून 75,000 रुपये करण्याची घोषणा केली आहे.
याव्यतिरिक्त, नवीन कर प्रणाली अंतर्गत पेन्शनधारकांसाठी कौटुंबिक पेन्शनमध्ये सूट मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्याचा प्रस्ताव होता. यामुळे अंदाजे ४ कोटी पगारदार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. या सुधारणांमुळे, पगारदार कर्मचाऱ्याला नवीन कर प्रणाली अंतर्गत मिळकत करात 17,500 रुपयांपर्यंत बचत होईल.