कलावंत पथकाशी आता माझा काहीही संबंध नाही...आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत

23 Jul 2024 17:57:32
 
aastad kale
 
 
मुंबई : गणेशोत्सव जवळ आला की चर्चा रंगते ती ढोलताशा पथकांची. आणि त्यातही सेलिब्रिटी ढोलपथकांचं आकर्षण फार वेगळं असतं. पुण्यातल्या मराठी कलाकारांनी एकत्र येत 'कलावंत पथक' ढोलपथक स्थापन केलं असून या पथकात मोहन दामले, अमित रानडे, आस्ताद काळे, अक्षय खाडीलकर, तेजस कुलकर्णी, अभिजित खांडकेकर, अजय नाईक, अजय पूरकर, श्रीकर पित्रे, तेजस्विनी पंडित, अनुजा साठे, आदिती सारंगधर, आरती पाठक अशी अनेक नव्या जुन्या कलाकारांची फळी आहे. मात्र, आता आस्ताद काळे या पथकाचा यापुढे भाग नसणार आहे.
 
आस्ताद काळेने फेसबुकवर पोस्ट शेअर ढोलपथकातून बाहेर पडल्याचं सांगितलं आहे. पण त्यानं हा निर्णय का घेतला, यावर मात्र त्यानं भाष्य केलं नाही आहे.
 
आस्तादने पोस्ट करत लिहिले आहे की, ‘नमस्कार.मी "कलावंत पथक" सोडलं आहे. या पथकाशी, त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही. तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुका इ. संबंधी मला संपर्क करू नये.
धन्यवाद’.
 aastad kale  
Powered By Sangraha 9.0