ताराराणींचा जीवनपट मांडणारा ‘इतिहास कट्टा’ कार्यक्रम रविवारी पार पडला

    23-Jul-2024
Total Views |
tararani
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इतिहास कट्टा – गप्पा इतिहासाच्या, गोष्टी माणसांच्या’ या कार्यक्रमाचे ‘गोष्ट तिची’ हे दुसरे पर्व रविवार दि. २१ जुलै रोजी बोरीवलीतील सांस्कृतिक केंद्राचे ‘ज्ञानविहार ग्रंथालय' येथे सकाळी ११ वाजता पार पडले. ‘रणरागिनी ताराराणी’ हा या कार्यक्रमाचा विषय होता. इतिहास अभ्यासक यशोधन जोशी यांनी ताराराणींचा जीवनपट या कार्यक्रमात उलगडून सांगितला. “छत्रपती शाहूंसोबतचा झगडा, कोल्हापूर गादीचे निर्माण, छत्रपती रामराजाचे प्रकरण, कोल्हापूरच्या वाड्यातील क्रांतीमधील अटक, पेशव्यांसोबत त्यांच्या बदलत्या भूमिका, अशा वादग्रस्त घटनांमुळे ताराराणींचे व्यक्तित्व वादळी ठरले तरीही त्यांचे ऐतिहासिक कर्तृत्व काळवंडले नाही” अशी भूमिका यशोधन जोशी यांनी मांडली.
 
माजी नगरसेवक हरीशभाई छेडा, बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे सुनील गणपुले, संजीव राणे या मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रविराज पराडकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. ललित पवार यांनी कार्यक्रम संपल्यानंतर आभारप्रदर्शन केले.