जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान पाहिल्यांदाच भारताकडे

पंतप्रधानांच्या हस्ते झाले उद्घाटन

    22-Jul-2024
Total Views |

 PM
जागतिक वारसा समितीचे ४६ वे अधिवेशन रविवार (२१ जुलै) पासून नवी दिल्लीतील मंडपम येथे सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी एक दशलक्ष डॉलर्सचं योगदान देण्याची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनात केली. या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक आँड्रे अझौले आणि युनेस्को जागतिक वारसा सचिवालयातले वारिष्ट अधिकारी तसंच विविध देशातले सांस्कृतिक मंत्री, राजदूत आणि डोमेन तज्ञ उपस्थित होते. भारत पहिल्यांदाच जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचं यजमानपद भूषवत आहे. जागतिक वारसा समितीवर भारताची चार वर्षांसाठी निवड झाली असून देशातल्या एकूण ४२ ऐतिहासिक वास्तूंचा जागतिक वारसा यादीत समावेश आहे.