मणिपूर हिंसाचाराचे विदेशी कनेक्शन; प्राध्यापकाविरोधात एफआयआर दाखल

02 Jul 2024 16:51:48
manipur violence professor fir
 

नवी दिल्ली :        कुकी व मैतेई समुदायात संघर्षाची ठिणगी पाडणाऱ्या एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली व्यक्ती उदय रेड्डी नामक असून बर्मिंगहॅम विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्स विषयाचे अध्यापन करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, उदय रेड्डी यांच्या विरोधात मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उदया रेड्डी हे सोशल मीडियावरील ऑडिओ संभाषणांच्या मदतीने लोकांना सुरक्षा दलांविरोधात भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.


हे वाचलंत का? -    काँग्रेस अध्यक्षांचा राज्यसभेत लाजिरवाणा इतिहास!


विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये बसून मणिपूरमधील कुकी आणि मेतेई समुदायांमध्ये द्वेष आणि तणाव वाढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, व्यक्तीचे ट्विटर अकाउंटही भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. ऑनलाईन संभाषणातून भडकावलेल्या हिंसाचार मणिपूरच्या मैतेई समुदाय आणि कुकी समुदायांमध्ये तणाव वाढत असल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, "दोषी व्यक्तीने जाणूनबुजून दुर्भावनापूर्ण हेतूने मैतेईंच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान केला आणि धार्मिक आधारावर मैतेई आणि इतर समुदायांमध्ये वैर वाढवले." त्यानंतर आता त्यांच्या विरोधात यूएपीए अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.






Powered By Sangraha 9.0