काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी!

02 Jul 2024 13:07:28
 
Pradnya Satav
 
मुंबई : काँग्रेसने डॉ. प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने सोमवारी याबद्दल एक परिपत्रक जारी करत त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे.
 
विधानपरिषद निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. डॉ. प्रज्ञा सातव या माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. उबाठा गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, असा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, आता काँग्रेसने सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
 
हे वाचलंत का? -  कौशल्याची दिंडी! ५ हजार आयटीआयच्या विद्यार्थ्यांसह मंत्री लोढांचा सहभाग
 
दुसरीकडे, भाजपनेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात पाच जणांची नावं जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने पंकजा मुंडे, योगेश तिलेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी निश्चित केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0