महिलांना असुक्षित वाटेल असं वातावरण तयार करु नये; उपसभापतींनी टोचले विरोधकांचे कान

02 Jul 2024 14:56:58
 
Neelam Gorhe
 
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्यानंतर आता उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नेत्यांचे कान टोचले आहेत. महिलांना असुक्षित वाटेल असं वातावरण तयार करु नये, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच दानवेंनी केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 
अंबादास दानवे यांनी सभागृहात प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्यामुळे दानवेंना ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. हा ठराव संमत केल्यानंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "कालचा प्रकार अत्यंत क्लेशदायक होता. मी एक महिला उपसभापती आहे. त्यामुळे एका महिला लोकप्रतिनिधीसमोर एक विरोधी पक्षनेता अशा भाषेत बोलत असेल तर उद्या महानगरपालिकांच्या महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर प्रत्येजण असं बोलेल. आम्ही जिथे जाऊ तिथे या भाषेत बोलायला सुरुवात केली तर काम करणं मुश्कील होईल."
 
हे वाचलंत का? -  ब्रेकिंग! अंबादास दानवे निलंबित
 
"याशिवाय मी हे करणारच अशी त्यांची दर्पोक्ती असते. त्यामुळे ही कुठली संस्कृती रुजवली जात आहे, याचा नेतेमंडळींनी विचार करायला हवा. महिलांना असुरक्षित वाटेल असं वातावरण केलं जातंय, याबद्दलही त्यांनी विचार करायला हवा. त्यामुळे अत्यंत न्याय्य, योग्य आणि उचित कारवाईचा प्रस्ताव आपण मांडलेला आहे," असे त्या म्हणाल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0