सरकार पडावं म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले!

02 Jul 2024 17:24:33
 
Shinde
 
मुंबई : महायूती सरकार पाडण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते पण सरकार पडलं नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायूती सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महायूती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. ज्या दिवशी हे सरकार स्थापन झालं तेव्हापासूनच हे सरकार पडेल असं म्हणणं सुरु झालं. पण असं करुन करुन या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. सरकार पडावं म्हणून त्यावेळी अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार काही पडलं नाही पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले."
 
हे वाचलंत का? -  "ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही त्यांना..."; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला
 
ते पुढे म्हणाले की, "गेल्या दोन वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांचा आणि घेतलेल्या निर्णयांचा आम्हाला अभिमान आहे. विचार, विकास आणि विश्वास ही आमच्या यशाची त्रिसुत्री आहे. आमच्या काळात ९ अधिवेशन आणि ७५ कॅबिनेट झाल्या. त्यात सुमारे ५५० हून अधिक निर्णय आम्ही घेतले. या काळात बरेच वेताळ आडवे आले परंतू, आम्ही विकासाचा विक्रम करत गेलो. घरात बसून नाही तर लोकांच्या दारात शासन नेल्यामुळे हे निर्णय आम्ही घेऊ शकलो," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0