Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार?

19 Jul 2024 17:50:48
union budget women entrepreneurship


नवी दिल्ली :       येत्या २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प(Union Budget 2024) संसदेत सादर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक घटकाला यंदाच्या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. केंद्र सरकार पायाभूत सुविधा, रेल्वे आणि एनर्जी या क्षेत्राकरिता मोठी तरतूद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, देशातल्या महिला वर्गाना यंदाच्या बजेटमधून नेमकं काय मिळणार, याकडे गृहिणींपासून नोकरी करणाऱ्या महिलांपर्यंत काय घोषणा होणार, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. यात महिला सक्षमीकरणांतर्गत महिला-केंद्रित उपक्रम शोधत व्यवसायसंधी उपलब्ध करून आर्थिक साक्षरता सुधारण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या उद्योजकता निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाऊ शकते. दरम्यान, बजेट सादर करण्याआधी देशातील महिला वर्गाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनांची मागणी वाढत आहे. सर्वसमावेशक अर्थसंकल्पात महिलांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या पाहिजेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.





Powered By Sangraha 9.0