रामललाच्या नित्यदर्शनाकरीता येणाऱ्यांसाठी खुशखबर!

18 Jul 2024 17:27:41

Ramlala Ayodhya

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ramlala Ayodhya)
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासने अयोध्येतील लोकांसाठी आणि रामलल्लाचे दररोज दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या संत-महंतांसाठी विशेष सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत दररोज दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरीता विशेष पास जारी केले जातील, जे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वैध असतील. गुरुवार, दि. १८ जुलै रोजी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने याबाबत आपल्या सोशल मिडियावरून माहिती जारी केली.

हे वाचलंत का? : घरवापसी! शाझिया बनली सपना; १४ लोकांनी केला हिंदू धर्मात प्रवेश

 श्री रामजन्मभूमी मंदिरात रामललाचे दररोज दर्शन घेऊ इच्छिणारे संत-महंत आणि अयोध्येतील नागरिक हे राम कचारी आश्रमातील ट्रस्ट कार्यालयात किंवा रामपथ येथील तीर्थ सेवा केंद्रात अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विशेष पास मिळू शकतो. एकदा दिलेला विशेष पास ६ महिन्यांसाठी वैध असेल, त्याचा कालावधी संपल्यानंतर पासचे नूतनीकरण केले जाऊ शकते. दैनंदिन दर्शनाच्या नावाने विशेष पास घेतला आणि महिन्यातून केवळ १-२ वेळाच दर्शनासाठी गेलात तर पास रद्द होऊ शकतो. विशेष पासधारक केवळ डी-१ गेटमधूनच प्रवेश करू शकतील. अशी माहिती न्यासकडून देण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0