अग्निवीरांकरिता राज्य सरकारची मोठी घोषणा; 'या' गोष्टींचा मिळणार लाभ!

17 Jul 2024 18:21:53
agniveer yojana state government


नवी दिल्ली :       हरियाणा सरकारने अग्निवीर योजना लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, हरियाणा सरकारने अग्निवीरांसाठी विशिष्ट नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या आरक्षणाचा लाभ हरियाणातील कॉन्स्टेबल, खाण रक्षक, वनरक्षक, जेल वॉर्डन आणि विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) यांच्या थेट भरतीसाठी लागू होईल, असे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सांगितले.




दरम्यान, अग्निवीरांसाठी लागू करण्यात आलेल्या आरक्षणांतर्गत हवालदार, खाण रक्षक, वनरक्षक, जेल वॉर्डन आणि एसपीओ या पदांसाठी १० टक्के कोट्याचा समावेश केला आहे. तसेच, गट ब आणि क नोकरीसाठी तीन वर्षांची वयोमर्यादा आणि पाच वर्षांची सूट समाविष्ट करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या अग्निवीर योजनेचा युवकांना फायदा व्हावा, हा उद्देश असल्याचे सैनी यांनी स्पष्ट केले.

याव्यतिरिक्त, गट सी नागरी पदांसाठी ५ टक्के क्षैतिज आरक्षण तर गट ब नोकऱ्यांसाठी १ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. अग्निवीरांना दरमहा ३०,००० रुपयांपेक्षा जास्त पगार देणाऱ्या औद्योगिक युनिट्सना राज्याकडून वार्षिक ६०,००० रुपये अनुदान मिळेल. शिवाय, अग्निवीरांना व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते ५ लाख रुपयांच्या कर्जासाठी पात्र असतील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.





Powered By Sangraha 9.0