गडचिरोली : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री हे बुधवारी गडचिरोली दौऱ्यावर होते. दरम्यान, यावेळी नागपूरहून गडचिरोलीला जाताना अजित पवारांनी हेलिकॉप्टमधील एक गमतीशीर किस्सा सांगितला. हेलिकॉप्टर ढगात गेल्यावर पोटात गोळा आल्याचे त्यांनी म्हटले. 'सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड' या गडचिरोलीतील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.
हे वाचलंत का? - शिवरायांची वाघनखं मुंबईत दाखल! मंत्री मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना यश
अजित पवार म्हणाले की, "नागपूरहून हेलिकॉप्टर मधून येताना सुरुवातीला बरं वाटलं. त्यानंतर हेलिकॉप्टर ढगात शिरलं आणि इकडे तिकडे बघतो तर ढगच होते. देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले होते. त्यांना म्हटलं, जरा बाहेर बघा काहीही दिसत नाहीये. आपण ढगात चाललोय, कुठे चाललोय काहीच कळत नाहीये. ते म्हणाले, काही काळजी करू नका. माझे आतापर्यंत ६ अपघात झालेले आहेत. मी ज्यावेळी विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये असतो तेव्हा अपघात झाला तरी मला काहीच होत नाही. त्यामुळे तुम्हालाही काहीच होणार नाही. मी सारखा मनात पांडूरंगा पांडूरंगा नाव घेत होतो," असा गमतीशीर किस्सा अजितदादांनी सांगितला.