पूजा खेडकरने नाव बदलून ११ वेळा दिली UPSC परिक्षा!

16 Jul 2024 11:43:51
 
Pooja Khedkar
 
पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असून त्यांनी तब्बल ११ वेळा युपीएससीची परिक्षा दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी नाव बदलून ही परिक्षा दिल्याचेही सांगण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
नियमानुसार, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६ वेळा युपीएससी परिक्षा देण्याची संधी असते. तर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी ९ वेळा ही परिक्षा देऊ शकतात. परंतू, या दोन्ही मर्यादा ओलांडून पूजा खेडकर यांनी तब्बल ११ वेळा परिक्षा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी नाव बदलून ही परिक्षा दिली आहे.
 
पूजा यांनी सुरुवातीला 'पूजा दिलीप खेडकर' या नावाने परिक्षा दिली. त्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून 'पूजा मनोरमा दिलीप खेडकर' या नावाने परिक्षा दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी ९ वेळा प्रयत्न संपल्यानंतरही पुन्हा दोनदा कशी परिक्षा दिली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, पूजा यांनी या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0