विकृत अहमद!

12 Jul 2024 22:35:38
 social
 
मरणोपरांत कीर्तीचक्र सन्मान प्राप्त झालेल्या कॅ. अंशुमन सिंह यांच्या पत्नीबद्दल सोशल मीडियावर अश्लील टिप्पणी करणार्या अहमदवर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. वीरगती प्राप्त झालेल्या कॅप्टनच्या पत्नीबद्दल घाणेरडे, अतिशय अश्लील बोलणार्या त्या अहमदला नुसती अटक नको, तर कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच हवी.
 
राष्ट्रपती भवनामध्ये कॅ. अंशुमन सिंह यांना मरणोपरांत कीर्तीचक्राने सन्मानित करण्यात आले. कॅ. अंशुमन यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना शब्दातीत दुःख झाले. मात्र, अंशुमन यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, या भावनेपुढे त्यांनी ते दुःख परतवले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या शूरवीराच्या आईने आणि पत्नीने तो सन्मान स्वीकारला. या सन्मानाचा फोटो सोशल मीडियावरही अनेकांनी प्रसारित केला. या दोघींचा धीरगंभीर चेहरा आणि डोळ्यांतील थांबलेले ते अश्रू पाहून अवघा देश गहिवरला. अशा वीरमाता आणि वीरपत्नी देशात आहेत. या भावनेने देश सद्गदित झाला.
 
मात्र, स्मृती सिंह यांचा हाच फोटो पाहून अहमद आणि त्याच्याच कौमच्या काही नालायक नीच लोकांनी अतिशय अश्लाघ्य विधाने केली. लैंगिकदृष्ट्या अतिशय खालच्या स्तराची ही त्यांची विधाने पाहून सोशल मीडियावरचे सगळेच आश्चर्यचकित झाले आणि संतापलेसुद्धा. देशासाठी वीरमरण पत्करलेल्या वीराच्या दुःखी पत्नीसाठी हा अहमद आणि त्याचेच कौमवाले ते लोक असा कसा विचार करू शकतात? वेळ काय, स्थळ काय, याबाबत या अहमदला आणि त्याच्या समविचार्यांना काही देणेघेणे नाही. स्मृती सिंह सुंदर स्त्री आहे. ती कोणी का असेना, तिच्यावर शारीरिक अत्याचार करायलाच हवा, असा त्यांचा विकृत विचार. एकाने तर या वीरपत्नीला कोकेनच्या नशेचीही उपमा दिली. या असल्या लोकांपासून कोणीच सुरक्षित नाही. विकृती, हिंसा आणि शोषण करण्याची वृत्ती यांच्यात ठासून भरली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या नराधमांना शासन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता दिल्ली पोलिसांनी आणि भारतीय जनतेनेही या असल्या प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवायला हवा आणि हो, अहमदसारखे लोक काय केवळ दिल्लीतच नाहीत, हेदेखील लक्षात घ्यायला हवे!
हे कसे थांबणार?
आठ वर्षांची इयत्ता तिसरीत असलेली बालिका एका पार्कमध्ये खेळायला गेली आणि ती घरी आलीच नाही. सगळे हवालदिल झाले. कुठे गेली असेल? काय झाले असेल? पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. ती तीन दिवस बेपत्ता होती. शेवटी तिचे शव मिळाले. तिच्यावर शारीरिक अत्याचार झाला होता. एवढीशी बालिका. शब्दच नाहीत. पोलिसांनी तिच्या खुन्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. ते खुनी सापडले. इयत्ता सहावीतली १२ वर्षांची दोन मुले आणि सातवी इयत्तेतील १३ वर्षांचा एक मुलगा.
 
भयंकर! लहान, निरागस बालिकेचे अपहरण करणे, तिच्यावर बलात्कार करणे आणि आपला गुन्हा उघड होऊ नये, म्हणून तिचा खून करणे, ही क्रूर, अमानवी कृत्ये या मुलांनी केली. या गुन्हेगारांचा शोध पोलिसांना श्वानपथकाद्वारे लागला. तिघांनीही गुन्हा कबूल केला. ही संतापजनक दुःखद घटना काल-परवाच आंध प्रदेशमधे घडली. गुन्हेगार अल्पवयीन आहे. मात्र, त्यांनी संघटितरित्या केलेला गुन्हा महाभयंकरच. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. या पूर्ण घटनेचा मागोवा घेताना वाटते की, भयंकर कृत्ये करून तीन दिवस ही मुले साळसूदपणे वावरत होती. इतकी गुन्हेगारी वृत्ती कुठून आली असेल? या तीनही मुलांच्या पालकांची काय भूमिका आहे? ते काय म्हणतील? आम्ही चांगले संस्कार केले.
 
पण, मुले बाहेर काय करतात, हे कसे कळणार? २४ तास मुलांसोबत कसे राहाणार? त्यांचे म्हणणे काहीअंशी खरे आहे; नव्हे त्यांच्या मुलांची ही विकृती पाहून हे पालक नरकापेक्षाही भयंकर मानसिकतेतून जात असतील. पण, तरीही वाटते की, याच काय कोणत्याही पालकांनी आपल्या मुलांशी दैनंदिन संपर्क, संवाद आणि जागरूक स्नेह कायम ठेवणे गरजेचे आहे. तो स्नेहसंवाद या पालकांचा त्यांच्या मुलांशी असता, तर कदाचित त्या गुन्हेगार मुलांच्या मनातील भयंकरपणा त्यांना जाणवला असता. तसेच, पार्कमध्ये ती बालिका एकटीच खेळत होती का? तसे जर असेल, तर तिचे पालक कुठे होते? किंवा ती पार्कमधून निघत असताना तिला कोणीच पाहिले नसेल का? त्या बालिकेचा मृत्यू मनाला चटका लावतो खरे, पण ही असल्या मानसिकतेची मुले पाहूनही वेदना होतात. हे कसे थांबणार?
 
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0