लोको-पायलट्सची ड्युटी ८ तासच; रेल्वेमंत्र्यांनी केला काँग्रेसवर आरोप!

11 Jul 2024 17:36:59
loco pilots duty railway minister


नवी दिल्ली :       केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राहुल गांधींच्या लोको-पायलट भेटीवर मोठा आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चुकीची माहिती प्रसारित करून रेल्वे कुटुंबीयांचे मनोधैर्य खचण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रेल्वेमंत्र्यांनी केला आहे. राहुल गांधी आणि लोको-पायलट यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

राहुल गांधी यांनी काही लोको-पायलटच्या भेटल्यानंतर रेल्वे चालकांच्या कामाच्या परिस्थितीवर काँग्रेसने केलेल्या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टचा केंद्रीय मंत्र्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. वैष्णव म्हणाले की, लोको-पायलटच्या ड्युटी तासांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले जाते तसेच, पुढील ट्रीप नंतर काळजीपूर्वक प्रदान केले जातात. सरासरी ड्युटी तास निर्धारित तासांत पाळले जातात. जूनमध्ये सरासरी कामाचे तास ८ तासांपेक्षा कमी असून केवळ अत्यावश्यक परिस्थितीत, कामाचा कालावधी निर्धारित तासांपेक्षा जास्त असतो.


हे वाचलंत का? -    सुप्रीम कोर्टाचा अदानी पोर्टला मोठा दिलासा; हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती!


विशेष म्हणजे लोको कॅबची स्थिती युपीए काळात खराब होती. मंत्री म्हणाले की, गेल्या १० वर्षांमध्ये एर्गोनॉमिक सीटसह कॅबमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यापैकी ७ हजाराहून अधिक लोको-कॅब वातानुकूलित आहेत. तसेच, एसी कॅबसह नवीन लोकोमोटिव्ह तयार केले जात आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

मंत्री म्हणाले की, लोको-पायलट जेव्हा ड्युटी पूर्ण करतो त्यानंतर त्यास ऑफ-ड्युटी विश्रांतीच्या सुविधेबाबत सरकार विचाराधीन आहे. तसेच, रनिंग रुममध्ये लोको-पायलट्सना पायाची मालिश करण्याची सुविधा देखील दिली जाते. परंतु, दुर्देवाने, लोको पायलटच्या कामाची परिस्थिती समजून न घेता काँग्रेसने यावर टीका केली, असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले.




Powered By Sangraha 9.0