पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जाणार!

11 Jul 2024 15:31:15

Hospital
मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रमुख चार रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनेने प्रलंबित मागण्यासाठी दि. २२ जुलैपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. गेली अनेक महिने निवासी डॉक्टर संघटना प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. परंतु या पाठपुराव्याला यश न आल्याने अखेर त्यांनी सामूहिकयती रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. केईएम,
 
सायन, नायर आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी होणार आहेत. निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी वसतिगृह अपूरे पडत आहेत. एकाच खोलीत तीन-चार निवासी डॉक्टर राहतात. तसेच विद्यावेतन, महागाई भत्ता अशा मागण्या ही प्रलंबित आहेत. त्यामुळे या सर्व मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टर संघटनेने सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0