पालिका कर्मचाऱ्यांना मिळणार 'आश्रय'

11 Jul 2024 18:33:29

सफाई
मुंबई : सफाई कर्मचाऱ्यांना हक्काचे घर देण्याचा प्रश्न बरीच वर्ष रखडलेला आहे. त्यात मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आश्रय योजनेतंर्गत येणाऱ्या दक्षिण मुंबईतील कोचीन स्ट्रीट येथील पुनर्विकास झालेल्या दोन इमारतीचा विस्तार केला जाणार आहे. या इमारतीच्या शेजारील प्लॉटवर सफाई कर्मचाऱ्यांसाठी ५४ घरे बांधली जाणार आहेत. पालिकेने यासंदर्भात निविदा मागवल्या आहेत.
 
आश्रय योजनेतंर्गत मुंबईत विविध ठिकाणी पहिल्या टप्प्यात सुमारे १२ हजार घरे बांधली जाणार आहेत. दक्षिण मुंबईतील कोचीन स्ट्रीट येथील पुनर्विकास प्रकल्पा आतापर्यंत ८६ कामगारांना घरे मिळालेली आहेत. दरम्यान या इमारतीच्या बाजूच्या एमबीपीटी प्लॉटवर विस्तारीत इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात पालिका कर्मचाऱ्यांसाठी ५४ घरे बांधली जातील. आश्रय योजनेअंतर्गत देण्यात येणारे घर २३८ चौरस फुटांचे आहे. तरी आश्रय योजनेतील कर्मचाऱ्यांना लवकरच हक्काचे घर मिळणार आहे.
Powered By Sangraha 9.0