बीडमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली!

11 Jul 2024 17:46:36
 
Jarange
 
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मनोज जरांगे राज्यभर ठिकठिकाणी दौरे करत असून सभा घेत आहेत. यातच आता गुरुवारी ते बीडमध्ये दाखल झाले असून याठिकाणी त्यांची जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, आज शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
मनोज जरांगे बीडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी धनगर व वडार जमातीला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करत असलेले आकाश निर्मळ यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांचा अध्यादेश लागू करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला १३ तारखेपर्यंत मुदत दिली आहे.
 
हे वाचलंत का? -  'मुसलमान’ म्हणून धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही!
 
मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं होतं. त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेलं होतं. यावेळी सगेसोयऱ्यांच्या अधिसुचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यासाठी जरांगेंनी राज्य सरकारला ३० जूनपर्यंत मुदत दिली होती. परंतू, शंभुराज देसाई यांनी जरांगेंना एक महिन्याचा वेळ मागितला होता. त्यानंतर त्यांनी १३ जुलैपर्यंत मुदत दिली. ही मुदत दोन दिवसांत संपणार असून याबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0