केंद्राच्या पीएलआय योजनेचा दूरसंचार क्षेत्राला मोठा फायदा; निर्यात १०,५०० कोटींवर!

10 Jul 2024 15:38:24
pli scheme telecommuinication sector

 
नवी दिल्ली :         केंद सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह(पीएलआय) योजने अंतर्गत दूरसंचार उपकरणांच्या उत्पादनविक्रीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. दरम्यान, दूरसंचार उपकरणे निर्मितीची विक्री एकूण ५० हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. पीएलआय योजनेच्या माध्यमातून ३,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली असून ५०,००० कोटी रुपये टप्पासह निर्यात अंदाजे १०,५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान, प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह(पीएलआय) योजनेंतर्गत देशातील दूरसंचार उपकरणांची विक्री ५०,०० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारच्या यशस्वी धोरणांचे द्योतक म्हणून या विक्रीकडे पाहता येईल. या योजनेच्या अमलबजावणीतून रोजगारनिर्मितीस साहाय्य मिळाले आहे.

विशेष म्हणजे दूरसंचार उपकरणांच्या उत्पादनासह आर्थिक वाढ आणि स्वावलंबनासाठी देशाला जागतिक केंद्र म्हणून स्थान दिले आहे. एकंदरीत, पीएलआय योजनेंतर्गत दूरसंचार उपकरणांच्या विक्रीने ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि आयात अवलंबित्व कमी करण्याच्या सरकारी प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे. या कामगिरीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेला चालना मिळणार आहे.




Powered By Sangraha 9.0