मारुती सुझुकी कंपनीचे सीईओ म्हणाले, हायब्रीड कारर्स कार्बन....!

10 Jul 2024 17:37:12
maruti suzuki ceo


नवी दिल्ली :      वाढत्या कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा हायब्रीड कारर्स कमी उत्सर्जन करतात, असे मत मारुती सुझुकीचे अध्यक्ष तथा सीईओ आर सी भार्गव यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, टाटा आणि ह्युंदाई मोटर्सकडून हायब्रीड कारर्सना महत्त्व दिले जात नाही. तसेच, इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत घट होईल या भीतीने टाटा आणि ह्युंदाई या दोन्ही कंपन्या हायब्रीड कारर्सच्या विरोधात आहेत, असेही भार्गव यांनी म्हटले आहे.

वास्तविक हायब्रीड कारच्या मदतीने पेट्रोल-डिझेल कारवर बंदी घालण्याचा मार्ग अत्यंत सोपा होऊ शकतो. तसेच, सरकारने ठरविले पाहिजे की, देशहितासाठी काय योग्य आहे, यावर विचार करण्यात येत असल्याचेही भार्गव यांनी एका मुलाखतीत सांगितले. वाहनांवर योग्य सबसिडी द्यावी का?, यावर बोलताना भार्गव म्हणाले की, हे सोपे आहे. इंधन आयातीवरील खर्च कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे ही सरकारची दोन उद्दिष्टे आहेत.

कारण भारताने २०७० पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे वचन दिले आहे. ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा किती हातभार आहे हे पाहिल्यानंतरच प्रोत्साहन द्यायला हवे. डिझेल किंवा सीएनजीवर चालतील. याचा अर्थ २०३४ मध्ये आजपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल कार विकणार आहोत आणि कार्बन उत्सर्जन वाढेल, अशी भीती भार्गव यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत आम्ही पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करणाऱ्या इतर तंत्रज्ञानाचा प्रचार करत नाही तोपर्यंत तुम्ही केवळ बॅटरीवर चालणाऱ्या ई-कारवर अवलंबून राहू शकत नाही.




Powered By Sangraha 9.0