अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंची रेकॉर्डब्रेक नोंद; दहा दिवसांत ओलांडला दोन लाखांचा टप्पा!

10 Jul 2024 15:03:31

Amarnath Yatra

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
अमरनाथ यात्रेकरीता (Amarnath Yatra) येणाऱ्या यात्रेकरूंनी दहा दिवसांत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी ४.७ लाख यात्रेकरूंनी श्री अमरनाथ यात्रा केली होती. दि. २९ जून पासून सुरू झालेल्या या ५२ दिवसांच्या यात्रेचा समारोप १९ ऑगस्टला होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी, तब्बल २४,८७९ यात्रेकरूंनी यात्रा काढली आणि वार्षिक तीर्थक्षेत्रातील बाबा अमरनाथचे दर्शन घेतले. त्यांनी नमूद केले की ३,८८० मीटर उंच गुहेला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या आता २०७,०१६ वर पोहोचली आहे.

हे वाचलंत का? : रामसेतूचा समुद्राखालील अचूक नकाशा तयार

बुधवारी सकाळी ४६२७ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी जम्मूतील भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प काश्मीर खोऱ्यात अमरनाथ गुहेच्या तीर्थयात्रेसाठी रवाना झाला. या तुकडीत ३४२२ पुरुष, १०२७ महिला, २६ मुले, १३७ साधू आणि १५ साध्वींचा समावेश होता. दररोज, यात्रेसाठी देशभरातून हजारो यात्रेकरू काश्मीरमध्ये येत आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीर सरकारने यात्रेकरूंच्या सोयीसाठी व्यापक व्यवस्था केली आहे.

Powered By Sangraha 9.0