राहुल गांधींनी पुन्हा ओकली हिंदूंविरोधात गरळ! म्हणाले, "हिंदू हिंसक होतात..."

01 Jul 2024 17:26:56
lop rahul gandhi statement


नवी दिल्ली :       संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक यांच्यात एकच जुंपल्याचे पाहायला मिळाले. यातच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एकच गदारोळ संसदेत माजला होता. सत्ताधारी पक्षाकडून राहुल गांधींच्या वक्ततव्याचा चांगला समाचार घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू समाजाला हिंसक म्हणणे हा गंभीर विषय असल्याचे संसदेत म्हटले आहे.

दरम्यान, संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा संपूर्ण हिंदू समाजावर निशाणा साधला आहे. एकप्रकारे त्यांनी हिंदू धर्म मानणाऱ्या सर्व लोकांना हिंसक म्हटले आहे. काँग्रेस नेत्याच्या या कृतीला पंतप्रधानांनी स्वतः उभे राहून प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांचा हिंदू धर्माबद्दलचा द्वेष आता लपून राहिलेला नसून मंदिरात जाणारे लोक मुलींची छेड काढतात, असे त्यांनी यापूर्वीही म्हटले होते.




विशेष म्हणजे न्याय्य लोकांचे रक्षण करण्यासाठी वज्र आवश्यक आहे असा संदेशही ऋग्वेद देतो. ऋग्वेदात 'रक्षस: संपिष्टन' म्हणजेच राक्षसांच्या उच्चाटनाचा संदेश दिला आहे. त्यामुळे त्रिशूळ फक्त जमिनीत गाडण्यासाठी नसून तो अंधकासुरासारख्या लोकांना मारण्यासाठीही आहे, हे राहुल गांधींनी समजून घ्यायला हवे, अशा आशयाचा सूर सर्वच स्तरातून उमटायला लागला आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा हिंदू धर्माबद्दलचा द्वेष दाखवून संसदेच्या नियमांची पायमल्ली केली आहे. त्यांनी भगवान शिवाच्या चित्राचा वापर करून संपूर्ण हिंदू समाजाला कलंक लावला आहे. आक्षेप घेतला असतानाही राहुल गांधींनी याबद्दल माफी मागितली नाही आणि त्याचे समर्थन करण्यासाठी म्हणून भाजप-आरएसएसला हिंसक संबोधण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.



Powered By Sangraha 9.0