'या' देशाने केली व्हिसा शुल्कात दुपटीने वाढ; कारण वाचून व्हाल थक्क!

01 Jul 2024 16:25:08
foreign student visa arised double


नवी दिल्ली :          जगभरातून विद्यार्थी दर्जेदार शिक्षणासाठी विविध देशांत स्थलांतर करताना दिसून येतात. याच स्थलांतराचा सामना करण्यासाठी चक्क ऑस्ट्रेलियाने नवी शक्कल लढवली आहे. या देशाने परदेशी विद्यार्थ्यांकरिता आकारण्यात येणाऱ्या व्हिसा शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. ०१ जुलै पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून परदेशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चात मोठा फरक पडणार आहे.





दरम्यान, ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेल्या व्हिसा शुल्क वाढीच्या निर्णयामुळे मागील शुल्कानुसार ऑस्ट्रेलियन डॉलर ७१०( ३९,५४१ रुपये ) इतके आकारण्यात येत होते. तर सुधारित निर्णयानुसार ऑस्ट्रेलियन डॉलर १,६०० ( ८९,१०० रुपये ) इतके व्हिसा शुल्क परदेशी विद्यार्थ्यांना आकारले जाणार आहे. विशेष म्हणजे सरकारने स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा शुल्क दुप्पट केले आहे, विक्रमी स्थलांतराला लगाम घालण्यासाठी सरकारने केलेले नवीनतम पाऊल असल्याचे सरकारने म्हटले आहे.

दि. ०१ जुलैपासून अमलात आलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसाची फी दुपटीने वाढली आहे, तर अभ्यागत व्हिसा धारक आणि तात्पुरता पदवीधर व्हिसा असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी व्हिसासाठी ऑनशोअर अर्ज करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशातच स्थलांतराचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलिया परदेशी विद्यार्थी व्हिसा शुल्क दुप्पट केल्याची चर्चा जागतिक स्तरावर पाहावयास मिळत आहे. फीमध्ये वाढ झाल्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करणे अमेरिका आणि कॅनडा सारख्या प्रतिस्पर्धी देशांपेक्षा खूप महाग झाल्याचे समोर आले आहे.





Powered By Sangraha 9.0