धर्म माझा मार्गदर्शक आहे : ऋषी सुनक

01 Jul 2024 13:13:15

rushi sunak
 
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्यात. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शनिवार, दि. 29 जून रोजी पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह लंडनमधील श्री स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मंदिरात उपस्थित लोकांशी त्यांनी हिंदू धर्माबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
 
“मी हिंदू आहे आणि मलाही तुमच्याप्रमाणे माझ्या श्रद्धेतून प्रेरणा आणि सांत्वन प्राप्त होते. धर्म माझा मार्गदर्शक आहे,” असे सुनक यांनी मत व्यक्त केले. “संसदसदस्य म्हणून भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेताना मला अभिमान वाटतो,” असेही त्यांनी सांगितले.
हीच शिकवण माझ्या मुलींना देणार “आपला धर्म आपल्याला आपले कर्तव्य निभावण्यास शिकवतो.
 
परिणामांची चिंता करण्यास शिकवते नाही. फक्त आपण हे ईमानदारीने निभावले पाहिजे. माझ्या आईवडिलांनी मला हेच शिकवले आणि मी ही माझे जीवन अशाप्रकारे जगण्याचा प्रयत्न करतो. हीच शिकवण मला माझ्या मुलींना मोठ्या झाल्यावर द्यायची आहे. समाजसेवेसाठी मला मार्गदर्शन करणारा हा धर्म आहे,” असेही सुनक पुढे म्हणाले.
मी अकाऊंटंट झालो असतो तर...
 
“हिंदू समाजातील मुलांनी आता फक्त डॉक्टर, वकील, अकाऊंटंट होणे पुरेसे नाही,” असे पुजार्‍यांनी म्हणताच ऋषी सुनक म्हणाले, “आता माझे आईवडील येथे असते आणि तुम्ही त्यांना असे विचारले असते, तर कदाचित ते तुम्हाला म्हणाले असते की, मी डॉक्टर, वकील किंवा अकाऊंटंट झाले असतो तर त्यांनी ते पसंत केले असते.”
Powered By Sangraha 9.0