एक धाव शेतकऱ्यांच्या अतूट बांधिलकीसाठी!

01 Jul 2024 19:39:21
Rain Marathon Dahanu

डहाणू :
वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पालघरमधील डहाणू येथे असलेल्या धुंदलवाडी आणि सासवंद या निसर्गरम्य गावामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी दि. ३० जून रोजी 'वर्षा मॅरेथॉन' आयोजित केली होती. या उपक्रमाचा उद्देश या ग्रामीण समुदायांचा कणा असलेल्या कष्टकरी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा होता. तरी ही मॅरेथॉन केवळ शारीरिक आव्हानांची नाही तर देशाच्या पोटासाठी अथक परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकता आणि समर्थनाची भावना वाढवण्यासाठी आहे, असे गौरवउद्गार अधिष्टाता डॉ. शुभांगी पारकर यांनी काढले.

वेदांता मेडिकल इन्स्टिट्यूट, डहाणू येथे शेतीवर गुजराण करणारे अनेक आदिवासी शेतकरी आहेत. त्यांची संस्कृती, त्यांचा आहार, जगण्याच्या पद्धती समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत संवाद गरजेचा आहे. या वर्षा मॅरेथॉनच्या निमित्ताने रुग्ण व डॉक्टरांमधील हा संवाद दृढ होण्यास मदत झाली. या कार्यक्रमाला स्थानिक सरपंच प्रभावती महाला आणि विजय कोडे, तसेच येथील रहिवासी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले. चैतन्य रावणकर, आदित्य बनकर आणि ओमश्री वानखेडे या विद्यार्थ्यांनी या वर्षा मॅरेथॉनसाठी विशेष मेहनत घेतली. तसेच या वर्षा मॅरेथॉनमध्ये मनीषा वळवी, प्रमिला माळी, सुनंदा भिज, प्रथमेश भिरणे यांनी अनुक्रमे प्रथम ते उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले.



Powered By Sangraha 9.0