"भाजप-भाजप कराल, तर जमिनीत गाडू"; शाहबाज, करीम, जमील आणि फारुखचा भाजप समर्थक कुटुंबावर हल्ला

09 Jun 2024 17:09:45
 modi yogi
 
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जौनपूर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत जखमींमध्ये सुमारे सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तणावामुळे गावात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवार, दि. ७ जून २०२४ रोजी घडली. जौनपूर जिल्ह्यातील शाहगंज पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. शनिवार, दि. ८ जून २०२४ भाडी गावातील विपिन कन्नौजिया यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. विपिनने दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जून रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास ते जेवण करून बाहेर फिरत होते.
 
हे वाचलंत का? -  बांगलादेशी तस्करांचा बीएसएफच्या सैनिकांवर हल्ला; कारवाईत एक तस्कर ठार
  
तेवढ्यात भावी छिडवा गावचे शाहबाज आणि करीम तेथे पोहोचले. दोघांनी विपिनकडे बघितले आणि म्हणाले, “भाडे लोक भाजप-भाजप बोलतात. मोदी-योगी काय उखडणार?" असे म्हणत शाहबाज आणि करीम यांनी विपिनवर हल्ला केला. या हल्ल्यात लोखंडी रॉड आणि काठ्यांचा वापर करण्यात आला.
  
डोक्याला मार लागल्याने विपिन बेशुद्ध पडला. त्यानंतर मोबीन, जमील, सगीर, फारुख हे ही तिथे पोहोचले. या सर्वांनी झोपलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांवरही हल्ला केला. हल्ल्यादरम्यान पीडितांना जातीवाचक शब्द आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आली. यादरम्यान विनोद, संतोष, पवन, सूरज, भोला आणि मंजू देवी हे गंभीर जखमी झाले.
 
 
Powered By Sangraha 9.0