"ती आता खासदार असल्याने..", कंगनावरील हल्ल्यानंतर शेखर सुमन संतापले

08 Jun 2024 15:07:13
 
kangana
 
 
मुंबई : अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतवर चंदीगढ एअरपोर्टवर हल्ला झाला होता. CISF जवान महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. अनेकांनी कंगनाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या असून काहीच दिवसांपुर्वी भाजपात प्रवेश केलेले अभिनेते शेखर सुमन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
शेखर सुमन म्हणाले की, "हे कोणाबाबतही झाले असले तरी हे पूर्णपणे चुकीचे आहे. कंगना आता मंडीतून खासदार आहे. कुणाला विरोध करायचाच असेल तर सभ्य पद्धत वापरली पाहिजे. अशा प्रकारची कृती अस्वीकार्य आहे”.
 
शेखर सुमन पुढे म्हणाले की, "वैयक्तिकरित्या कोणाची कितीही समस्या असली तरी ती सार्वजनिकपणे मांडणे योग्य नाही. अशी घटना पुन्हा होऊ नये." राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी या थप्पड मारण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कॉन्स्टेबलवर कारवाई करण्यात आली असून तिला निलंबित करण्यात आले आहे. तसेच तिच्यावर एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0