मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

08 Jun 2024 13:23:58

railway


मुंबई, दि.७ : 
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.

मुख्य मार्ग

सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा, जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील. विद्याविहारनंतर या लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्ग

सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन मार्गावरील लोकल, सीएसएमटी ते गोरेगाव / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लाॅक कालावधीत पनवेल – कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लाॅक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे

चर्चगेट – मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर
सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
ब्लॉक काळात जलद मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट – मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच चर्चगेट लोकलला वांद्रे आणि दादरपर्यंत चालविण्यात येणार आहेत.
Powered By Sangraha 9.0