१० वर्षांनी पहिल्यांदाच नेटफ्लिक्समध्ये होणार महत्वपुर्ण बदल, कोणते जाणून घ्या

08 Jun 2024 15:50:20
 
netflix
 
 
मुंबई : जगातील लोकप्रिय ओटीटी वाहिनी नेटफ्लिक्सने १० वर्षांनंतर मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्स लवकरच एक नवीन डिझाईन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स त्यांच्या अ‍ॅपमध्ये मोठी सुधारणा घडवून आणणार आहे आणि यामुळे वापरकर्त्यांना त्याचा मोठा फायदा अनुभवायला मिळणार आहे. जगभरात करोडो लोकं नेटफ्लिक्सवर कंटेट पाहात असतात आणि त्यांचे काम अधिक सोप्पे करण्यासाठी हा बदल घडवण्यात येणार आहे.
 
नेटफ्लिक्सच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की, वापरकर्ते होम स्क्रीन स्कॅन करण्यात बराच वेळ घालवत आहेत. या प्रक्रियेला त्यांनी ‘आय जिम्नॅस्टिक्स’असं नाव दिले आहे. टायटल, ट्रेंडिंग सेक्शन, आर्टवर्क, ट्रेलर्स यांच्यामध्ये दर्शक आपला जास्त वेळ घालवत आहेत.
 
नेटफ्लिक्स रीडिझाइन करताना कोणते मोठे बदल होणार ते जाणून घेऊयात
 
शो आणि चित्रपटांचे थंबनेल आता मोठे दिसणार आहेत. याद्वारे शीर्षक पाहणे सोपे होईल आणि युजर त्यावर लगेच क्लिक करु शकतली. तसेच, माहिती अधिक सुव्यवस्थित पद्धतीने सादर केली जाणार आहे. मुख्य तपशील हायलाइट केले जाणार आहेत.
वापरकर्त्यांसाठी एक नवीन सेक्शन तयार करण्यात येणार आहे, जिथे त्यांनी आधी पाहिलेले सिनेमे, शोज सेव्ह राहू शकतील आणि त्याला माय नेटफ्लिक्स टॅब असे म्हटले जाईल. तसेच, डाव्या बाजूचा मेन्यू स्क्रिनच्या वरच्या बाजूला हलवण्यात येणार असून त्यामुळे “होम,” “शो,” “चित्रपट” आणि “माय नेटफ्लिक्स”सारखे मुख्य पर्याय लगेच दिसतील.
Powered By Sangraha 9.0