सोने चांदी खरेदीसाठी सुवर्णसंधी? सोने व चांदीत प्रचंड घसरण !

08 Jun 2024 17:36:06

Gold
 
 
मुंबई: गुंतवणूकदारांना सोने व चांदी खरेदीसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी, युएस पेरोल डेटा, डॉलर्स निर्देशांकात झालेली वाढ व चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने घोषित केल्याप्रमाणे विदेशी मुद्रेत न झालेला बदल, देशांतर्गतील धोरणे, घटलेली मागणी अशा अनेक कारणांमुळे सोन्याच्या निर्देशांकात काल आणि आज मोठी घसरण झाली आहे.
 
युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात तब्बल ३.४५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ३.३३ टक्क्यांनी घसरण झाली. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.०२ टक्क्यांनी घसरण होत सोने संध्याकाळपर्यंत ७१३४१.०० पातळीवर पोहोचले होते.
 
'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार,भारतातील सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम दरात १९०० ते २०८० रुपयांनी घट झाली आहे. तर मुंबईत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम दरात १९०० ते २०८० रुपयांनी घसरण होत १० ग्रॅम दर प्रति २२ कॅरेट ६५७०० व २४ कॅरेट ७१६७० पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईत, चेन्नई, कोलकाता मध्ये सोन्याचे प्रति ग्रॅम दर २२ कॅरेटला ६६५० तर २४ कॅरेट दर ७२५५ रुपयांवर पोहोचले आहेत.
 
चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात घसरले -
 
चांदीचे मुंबईत प्रति १ किल़ो दर ४५०० रुपयांनी घसरून ९१५०० रुपयांनी प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर १०० ग्रॅम चांदीच्या दरात ४५० रुपयांनी घसरण होत ९१५० रुपयांवर पोहोचले आहे. एमसीएक्सवरील चांदी निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२३ टक्क्यांनी घसरण होत चांदीची पातळी ८८८८८ प्रति किलोवर पोहोचले आहेत.
टीप - या किंमती अंतिम नसून एकूण बाजारातील आहेत यामध्ये वाढीव कर किंमतीचा समावेश नाही.
 
Powered By Sangraha 9.0