२३ वर्षे जुन्या प्रकरणात १ जुलैला होणार शिक्षेचा निर्णय!

07 Jun 2024 18:16:43
medha-patkar-delhi-lg-vk-saxena-defamation-case



नवी दिल्ली :      मानहानी प्रकरणात दोषत्व सिध्द झालेल्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याबाबत दिल्ली येथील न्यायालय १ जुलैला रोजी निकाल देणार आहे. दरम्यान, दिल्ली विधी सेवा प्राधिकरणाने व्हीआयआर(व्हिक्टिम इम्पॅक्ट रिपोर्ट) सादर केला असून या प्रकरणी कमाल दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकते.

दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात मेधा पाटकर दोषी ठरल्या आहेत. सदर प्रकरणात दोषी ठरल्यानंतर पीडितेला झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी व्हीआयआर तयार करण्यात येते. विशेष म्हणजे २३ वर्षे जुने प्रकरणात व्हीके सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने २४ मे रोजी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना दोषी ठरवले होते.
 
हे वाचलंत का? - मानहानी खटल्यात राहुल गांधींना न्यायालयाचा दिलासा!


सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी भ्याड संबोधणे आणि हवाला व्यवहारात गुंतल्याचा आरोप करणे हे केवळ बदनामीच नाही तर त्यांच्या विरोधात नकारात्मक भावना निर्माण करते, असे या निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे. सक्सेना यांनी पाटकर यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले होते.

वीके सक्सेना आणि मेधा पाटकर यांच्यात सन २००० पासून कायदेशीर लढाई सुरू आहे. मेधा पाटकर यांनी व्हीके सक्सेना यांच्या विरोधात नर्मदा बचाव आंदोलनादरम्यान जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यासोबतच एका टीव्ही चॅनलवर मेधा यांनी सक्सेना यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी दोन खटलेही दाखल केले होते.




Powered By Sangraha 9.0