संसदेत पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न; आरोपी कासिम, मोनिस आणि सोयेब पोलिसांच्या ताब्यात

07 Jun 2024 12:23:22
 parliament
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संसदेत घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की तीन लोकांना सीआयएसएफच्या जवानांनी संसदेच्या संकुलात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पकडले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. कासिम, मोनिस आणि सोयेब अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध बनावटगिरी आणि फसवणुकीशी संबंधित आयपीसी कलमे लावण्यात आली आहेत.
 
वृत्तानुसार, या तिघांना नियमित सुरक्षा आणि ओळख तपासणीदरम्यान फ्लॅप गेटच्या प्रवेशद्वारातून संसद भवनात प्रवेश करताना अटक करण्यात आली. दरम्यान, सीआयएसएफच्या जवानांना त्यांचा हालचाली संशयास्पद वाटला. सीआयएसएफच्या जवानांनी तिघांनाही थांबवून चौकशी केली असता, त्या लोकांची आधारकार्डे बनावट असल्याचे उघड झाले आणि तिघेही डीव्ही प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये काम करत होते, ज्यांना संसदेच्या संकुलात खासदारांसाठी विश्रामगृह बांधण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. 
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये 'हमारे बारह'वर बंदी; मुस्लिम संघटनांनी केली होती बंदीची मागणी
 
सीआयएसएफने तिघांनाही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला असून आयपीसीच्या कलम ४६५, ४१९, १२०बी, ४७१, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे की २०२३ साली देखील संसदेत सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले होते, ज्यावर अलीकडच्या बातम्यांनुसार त्या प्रकरणी ६ आरोपींविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.
  
ललित झा, सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल धनराज शिंदे, नीलम रानोलिया आणि महेश कुमावत अशी या ६ आरोपींची नावे आहेत. या लोकांनी संसदेत गोंधळ घालण्याचा डाव आखला होता. याशिवाय त्याच्याकडे एका मोचीने बनवलेले खास शूज होते ज्यात सोलमध्ये २.५ इंच खोल जागा होती. या लोकांनी या जागेत धुराचे डबे लपवून संसदेत आणले होते. मात्र, खासदारांच्या तत्परतेनंतर या सर्वांना पकडण्यात आले होतो. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0