मोदींना हटवण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने तडीपार केले!

07 Jun 2024 16:37:50
Eknath Shinde on indi alliance

मुंबई :
सर्वप्रथम मोदींना पंतप्रधान बनवणे हाच आमचा उद्देश आहे. जो आता पुर्ण होताना दिसत आहे. सरकार पडणार असे म्हणाऱ्या संजय राऊतांना अद्याप योग्य ज्योतिष मिळालेला नाही. त्यामुळे विरोधकांना जनतेने जागा दाखवली आहे. तसेच मोदींना हटवण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने तडीपार केलेले आहे. लोकसभेच्या निकालानंतर ही महाराष्ट्राचे सरकार स्थिर असेल, सरकारला कुठला ही धोका नाही, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान दुसरीकडे शिंदे गटाचे ५ ते ६ आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती उबाठाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितल्याचा दावा एका वृत्तसंस्थेने केला आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलेले आहे.

हे ही वाचा : "मराठ्यांनी साथ सोडली, पण मुस्लिम माझ्यासोबत देवासारखे राहिले" - बीडचे खासदार बजरंग सोनवणे

एनडीएच्या नेतृत्वाची सर्वसंमतीने निवड झालेली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणुकीनंतर पहिली बैठक होत आहे. त्यामुळे लवकर नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तरी या निवडणुकीत विरोधकांच्या रणनितीला सुरुंग लावत. मोदी हटावच्या नाऱ्याला एनडीएला पुर्ण बहुमत जनतेने दिलेले आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. गेल्या १० वर्षात त्यांनी केलेली कामे पाहता त्यांना अजून ५ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी घेणार आहेत. जी ऐतिहासिक घटना आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


 
Powered By Sangraha 9.0