मोठी बातमी: बजाज फायनान्सकडून हाउसिंग फायनान्सला आयपीओसाठी मान्यता ४००० कोटींचा आयपीओ येणार

07 Jun 2024 18:07:06

bajaj housing finance
 
मुंबई: बजाज हाउसिंग फायनान्सला आयपीओमार्फत निधी उभारणी करण्यासाठी बजाज फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. बजाज हाउसिंग फायनान्स ही बजाज फायनान्स कंपनीची उपकंपनी आहे. कंपनीला १० रुपये प्रति समभाग दर्शनी मूल्यावर मान्यता देण्यात आली आहे. फ्रेश इश्यू व ऑफर फॉर सेल (OFS) माध्यमातून ४००० कोटी रुपये उभे केले जाणार आहेत.
 
प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटल्याप्रमाणे, हे बाजार परिस्थिती,भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड, बीएसई लिमिटेड, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि इतर नियामक मंडळाच्या प्राधिकरणाच्या लागू व आवश्यक असलेल्या मान्यताच्या अधीन आहे.' असे म्हटले आहे.
 
बजाज फायनान्स कंपनीचे बजाज फिनसर्व्हमध्ये ५१.३४ टक्के भागभांडवल आहे. ही कंपनी गृह कर्ज व तत्सम सेवा सुविधा देते. बजाज हाउसिंग फायनान्सला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये ३८ टक्के अधिक निव्वळ नफा होत १७३१ कोटींवर पोहोचला होता. कंपनीचा एनपीए ०.१० टक्क्यांवर पोहोचला होता. मागील वर्षाच्या ६१.७ टक्यांच्या तुलनेत यावर्षी व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management) मध्ये घट होत ५७.८ टक्क्यांवर पोहोचले होते.
 
विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) असलेल्या बजाज हाउसिंग फायनान्सला संचालक मंडळाने जून ६ रोजी आयपीओसाठी मान्यता दिली असल्याचे म्हटले गेले. सप्टेंबर २०२२ मध्ये ५०००० कोटींहून अधिक पातळी असलेल्यांसाठी मार्गदर्शक तत्वे आरबीआयने जाहीर केली होती.या यादीत बजाज हाउसिंग फायनान्सचा देखील समावेश होतो. त्यामुळे सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनीला शेअर बाजारात नोंदणीकृत (सूचीबद्ध) व्हावे लागणार आहे. शेअर बाजारातील आजच्या सत्रात शेअर ५ टक्क्यांनी वाढत ७१७५.०० वर बंद झाला आहे. दिवसभरात तो ७२९८.०० पातळीवर देखील पोहोचला होता.
 
Powered By Sangraha 9.0