"मराठ्यांनी साथ सोडली, पण मुस्लिम माझ्यासोबत देवासारखे राहिले" - बीडचे खासदार बजरंग सोनवणे

07 Jun 2024 14:59:50
 Bajrang Sonwane
 
छत्रपती संभाजीनगर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात बीड लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. बीडमध्ये यावेळी भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्यात सामना होता. शेटवच्या टप्प्यापर्यंत गेलेल्या मतमोजणीत पंकजा मुंडेंचा सात हजार मतांनी निसटता पराभव झाला. बजरंग सोनवणे यांच्या विजयात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाची मोठी भूमिका होती. मात्र, त्यांनी विजयानंतर 'न्यूज १८ लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या विजयाचे श्रेय मुस्लिम मतदारांना दिले आहे.
 
मुलाखतीत अँकरच्या प्रश्नाला उत्तर देताना बजरंग सोनवणे म्हणाले की, "या निवडणुकीत सामाजिक समिकरण जर बघितलं तर मला मुस्लिम समाजाने टोकाची मदत केली, मला डोक्यावर घेतलं. मराठा समाजाने किंबहुना मला कुठे सोडलं. पण मुस्लिम समाजाने मला कुठेही सोडलेले नाही. मुस्लिम समाज हा माझ्याबरोबर देवतासारखा राहिलेला आहे."
 
 
Powered By Sangraha 9.0