चार दिवस मोठी भरती; समुद्रात जाऊ नका

06 Jun 2024 19:32:31

bmc


मुंबई, दि.६ : प्रतिनिधी 
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार असून साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ५ ते ८ जूनदरम्यान दररोज समुद्रात मोठी भरती येणार आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांत एकूण २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. सगळ्यात मोठी भरती २० सप्टेंबर रोजी येणार असून यावेळी ४.८० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पालिकेने येत्या पावसाळ्यासाठी भरती-ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ,मुंबईसह महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी पुण्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसला. दोन दिवसांपासूनच राज्यातील काही भागात मान्सूपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दरम्यान पुढील चार दिवस मुंबईत समुद्र किनाऱ्यावर साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबई महानगर पालिकेने धोक्याचा इशारा दिला असून समुद्रात जाऊ नये. तसेच, किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात समुद्रात उंच लाटा उसळत आसतात.जून महिन्यात ६,७,८,२३,२३,२४ आणि २५ जूनला मोठी भरती आहे. समुद्राच्या भरती दरम्यान पर्यटक मुंबईतल्या समुद्रकिनारी मोठी गर्दी करतात. यातून अपघात होण्याची शक्यता असते. यावेळी बचाव करण्यासाठी जीवरक्षक आणि मुंबई पोलीस समुद्रा किनारी तैनात करण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिके नागरिकांना इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज ७ जून आणि ८ जूनलाही साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे. या दरम्यान मोठा पाऊस पडल्यास सखल भागात पाणी साचून मुंबईची वाहतूक खंडित होऊ शकते. या हाय-टाइटच्या काळात मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Powered By Sangraha 9.0