मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांकरिता भरती सुरू; आजच अर्ज करा
05 Jun 2024 16:00:47
मुंबई : 'मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड' अंतर्गत नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. 'मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. 'मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड'मधील रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे. भरतीसंदर्भातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता अधिक तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
महाव्यवस्थापक (०१ जागा)
अतिरिक्त महाव्यवस्थापक (०१ जागा)
शैक्षणिक पात्रता -
मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनियरिंग विषयातील पदवी
सदर विषयात पदव्युत्तर शिक्षण असल्यास विशेष प्राधान्य
वयोमर्यादा -
५० वर्ष
उमेदवारास अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाचा आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०७ जून २०२४ असेल.