"भारतीयांनी हिंदुत्वाचा विचार नाकारला"; इंडी आघाडीच्या जागा वाढताच पाकिस्तानी नेत्याची प्रतिक्रिया

05 Jun 2024 12:03:13
 INDI
 
इस्लामाबाद : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या लोकसभा निवडणूकीच्या निकालावर सगळ्या जगाचे लक्ष लागून होते. पण, भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानला या लोकसभा निवडणूकीत विशेष रस असल्याचे दिसून आले. माजी मंत्री, राजकी नेते, प्रसिद्ध व्यक्तींनी भारताच्या लोकसभा निवडणूकीच्या निकालावर भाष्य केले.
 
लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या कमी होत चाललेल्या जागा पाहून पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी आनंग व्यक्त केला. भारतातील जनता नरेंद्र मोदी आणि त्यांची विचारधारा नाकारेल आणि भाजपचा पराभव करेल, असा मला पूर्ण विश्वास असल्याचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले आहे. याआधीही फवाद चौधरींनी इंडी आघाडीतील नेत्यांचे कौतुक केले आहे.
 
 
  
फवाद चौधरीने ट्विट करून लिहिले, “भारतीय मतदारांमध्ये नेहमीच आत्मविश्वास राहिला आहे की ते द्वेष पसरवणाऱ्यांना नाकारतील. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लोकसभेत पोहोचणे किती कठीण आहे, हे निकालावरून स्पष्ट होते. दुसरीकडे काँग्रेसचे राहुल गांधी त्यांच्या दोन्ही जागा जिंकत आहेत." मोदी सरकारच्या धोरणांमुळे भारतातील शांतता बिघडली आहे, असा आरोपही त्यांनी याआधी केला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0