घटलेल्या मागणीमुळे सेवा क्षेत्रात घसरण मात्र रोजगार निर्मितीत मोठी वाढ

05 Jun 2024 12:14:11

service imdustry
 
 
मुंबई: घटलेल्या मागणीमुळे गेल्या ५ महिन्यातील सेवा क्षेत्रात घट झाली असल्याचे एचएसबीसी इंडिया सर्व्हिस परचेसिंग मॅनेजर या अहवालात म्हटले गेले आहे. एस अँड पी ग्लोबलने हा अहवाल प्रसिद्ध केला असून यामध्ये ५ महिन्यात मागणी घटल्याचा फट का सेवा क्षेत्रात बसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सेवा क्षेत्रातील निर्यातीतील वेग वाढला असून २१ महिन्यातील रोजगारी निर्मि तीत सर्वाधिक वाढ झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
 
घसरलेल्या सेवा क्षेत्रातील निर्देशांक मे महिन्यात ६०.२ वर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात या निर्देशांकाची संख्या ६०.८ होती. मात्र हा निर्देशांक ३४ व्या महिन्याच्या वाढीतील मर्यादित राहिली आहे. ५० पेक्षा पातळी अधिक राहिल्याने निर्देशांक समाधान कारक पातळीवर आहे.
 
या अहवालावर प्रतिक्रिया देताना एचएसबीसीचे अर्थतज्ज्ञ म़ैत्रेयी दास म्हणाल्या, ' देशांतर्गत नवीन ऑर्डर किंचित हलक्या झाल्या, परंतु मजबूत मागणी परिस्थिती आणि यशस्वी जाहिराती दर्शविणारा,मजबूत राहिल्याने मे महिन्यात भारताची सेवा क्रियाकलाप किंचित संथ गतीने वाढला'.
 
निर्देशांकात घट झाली असली तरी मागणीची पातळी अधिक राहिली आहे. वाढत्या स्पर्धेत ही संख्या घसरली असली तरी सेवा क्षेत्रातील मागणी निश्चित मोठी आहे. पर्यावरणातील बदल, उष्णता हे देखील किंचित घसरणीचे कारण ठरले असू शकते. चीन मध्ये बाजारात रिक्वहरी झाली असताना अमेरिकन बाजारातील मागणी देखील मजबूत स्थितीत राहिली आहे. मात्र यात सकारा त्मक गोष्ट ही के सेवा क्षेत्रातील मागणी व विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली असुन ही ऑगस्ट २०२२ पासून रोजगार निर्मितीत झालेली सर्वाधिक वाढ ठरली आहे.
 
तसेच या अहवालात नमूद केल्याप्रमाणे उत्पादनातील ' इनपूट ' खर्चात वाढ झाल्याने एप्रिल महिन्यापासून किंमतीत अथवा किंमतीच्या स्तरावर दबाव देखील निर्माण झाले आहे. वस्तू व सेवांची किंमत वाढल्याने हा आर्थिक भार ग्राहकांवर पडला निश्चि तच त्यामुळे ग्राहकांना भुर्दंड पडला होता. तसेच महागाईत वाढ झाल्याने आगामी काळातील व्याजदरात कपात करायची की नाही यावर देखील आरबीआयचा निर्णय अवलंबून असणार आहे असे अहवालात म्हटले आहे. मागील महिन्यात भारताच्या अर्थव्यवस्थेत ७.८ टक्क्यांनी वाढ झाली होती.
 
Powered By Sangraha 9.0