प्रकाश झा ने साधला अनुरागवर निशाणा; 'गँग ऑफ वासेपूर'चा उल्लेख करत म्हणाले 'जे राजकारण केलं.. '

04 Jun 2024 13:52:22
 
anurag
 
 
मुंबई : अनेक लोकप्रिय वेब सीरीजच्या यादीत गॅंग्स ऑफ वासेपूर हे नाव आजही अग्रस्थानी आहेच. या सीरिजच्या माध्यमातून अभिनेता पंकज झा यांनी तुफान प्रचंड मिळवली. त्यांच्या भूमिकेचं कौतुकही प्रेक्षकांनी केलं. मात्र, आता नुकत्याच एका मुलाखतीत प्रकाश यांनी अनुराग कश्यपवर निशाणा साधत त्यांनी मला गँग्स ऑफ वासेपूरमधून बाहेरचा रस्ता दाखवला असं पंकज झा ने म्हटलं आहे.
 
प्रकाश झा म्हणाला की, 'गँग्स ऑफ वासेपूर' यात पंकज त्रिपाठी यांनी साकारलेली सुल्तान कुरैशी ही भूमिका प्रथम पंकज झा ला ऑफर करण्यात आली होती. परंतु, त्यांची निवड झाल्यानंतर अचानक त्यांना काढण्यात आलं आणि त्यांच्या जागी पंकज त्रिपाठी यांची कास्टिंग केली गेली. "माझ्या पाठीमागून जे राजकारण केलं जातं त्याला काहीच अर्थ नाही. कारण, या सगळ्यांचा तेव्हाच विजय होईल जेव्हा या गोष्टींचा मला त्रास होईल किंवा माझं एखादं नुकसान होईल. जे लोक इतरांच्या पाठीमागून राजकारण करतात ते खरंतर भित्रट असतात. नाही तर ते कधीच समोर येऊन बोलले असते", असं पंकज झा म्हणाला.
 
पुढे तो म्हणाला की, "जर सत्या आणि गुलाल सारखे सिनेमा जर कलाकार करु शकतात तर ते डारेक्टर्सलाही नक्कीच तयार करु शकतात. पण इथे इतके घाबरट आणि आधारहीन लोक आहेत जे स्वत:चं मतही मांडू शकत नाही. नंतर मला कळलं की डायरेक्टरची अवस्था सुद्धा वाईटच होती. त्यालाच कुठे काम मिळत नव्हतं आणि तो याच प्रोजेक्टवर ३६ वेगवेगळी काम करत होता."दरम्यान, गँग्स ऑफ वासेपूर मध्ये मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, हुमा कुरेशी, पंकज त्रिपाठी, तिग्मांशू धुलिया, राजकुमार राव अशी तगडी स्टार कास्ट होती.meOne 
Powered By Sangraha 9.0