नागपूरात गडकरींचा गड भक्कम! २९ हजारांहून अधिक मतांची आघाडी़

04 Jun 2024 12:20:33
 
Gadkari vs Thackeray 
 
नागपूर : आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड भक्कम आहे. तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे पिछाडीवर आहेत. नितीन गडकरी हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेले दिसत आहेत.
 
नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत होती. दरम्यान, सध्या नितीन गडकरी १ लाख ८१ हजार ४०३ मतांनी आघाडीवर आहेत तर विकास ठाकरे हे १ लाख ४४ हजार ५५५ मतांनी पिछाडीवर आहेत.
 
हे वाचलंत का? -  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणे आघाडीवर! उबाठा गटाला धक्का
 
त्यामुळे नितीन गडकरी आपला गड राखणार की, विकास ठाकरे निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आतापर्यंत नागपूरात गडकरींची सरशी कायम आहे. पहिल्या फेरीपासूनच मतदारांनी गडकरींना कौल दिल्याचे दिसत आहे.
 
राज्यात यंदा महायूती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असून यात कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0