पीएनबी आणि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) यांच्यातील सामंजस्य करार

04 Jun 2024 17:44:12

eng
 
 
मुंबई: पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), देशातील आघाडीच्या बँकांपैकी एक आणि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमि टेड (IIFCL),पायाभूत सुविधा प्रकल्पांना दीर्घकालीन आर्थिक सहाय्य देण्यासाठी 2006 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या संपूर्ण मालकीच्या भारत सरकारच्या कंपनीने पीएनबी च्या द्वारका, नवी दिल्ली येथील कॉर्पोरेट कार्यालयात सामंजस्य करार (MOU) वर स्वाक्षरी केली. या हालचालीमुळे, दोन्ही संस्था संयुक्तपणे पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी सह योग करतील ज्यामध्ये कंसोर्टियम/एकाधिक कर्ज व्यवस्था अंतर्गत योग्य परिश्रम प्रक्रियेनंतर संभाव्य कर्जदारांना आर्थिक सहा य्य प्रदान करता येईल.
 
या सामंजस्य करारावर पीएनबीचे एमडी आणि सीईओ श्री अतुल कुमार गोयल आणि आयआयएफसीएलचे (IIFCL) एमडी डॉ. पद्मनाभन राजा जयशंकर यांनी यानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वाक्षरी केली.यावेळी, पीएनबीचे सर्व कार्यकारी संचालकांसह पीएनबी आणि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) चे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
हा सामंजस्य करार देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल आणि या प्रयत्नात दोन्ही बाजूंच्या पूर्ण सहभागाची ग्वाही त्यांनी दिली.
 
Powered By Sangraha 9.0